कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी आणि मुलीची हत्या, सासू जखमी, आरोपी पती पोलिसांना शरण

कोपरगाव इथल्या खडकी भागात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे.

Updated: Mar 6, 2018, 06:23 PM IST
कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी आणि मुलीची हत्या, सासू जखमी, आरोपी पती पोलिसांना शरण  title=

कोपरगाव : कोपरगाव इथल्या खडकी भागात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. खून करणारा आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या जखमी सासूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

गणेश भीमराव खरात असं या आरोपीचं नाव असून पत्नी सुकेशनी उर्फ गौरी, तीन वर्षाची मुलगी दिदी आणि दोन मुलांसह तो राहत होता. गणेशची सासू रुख्मिणी सुभाष गवई या लेकीला माहेरी नेण्यासाठी सोमवारी कोपरगावात आल्या होत्या.

सकाळी सासू आणि  गणेशचं कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण सोडवण्यासाठी गणेशची पत्नी गेली. मात्र राग अनावर झालेल्या गणेशने पत्नीवरच कु-हाडीने घाव घातले. तर वयोवृद्ध सासुलाही कुर्हाडीने मारल्याने ती ही गंभीर जखमी झाली. या कृत्यानंतर आरोपी गणेश खरातला पोलीसांनी ताब्यात घेत पुढचा तपास सुरु केलाय.