कोकण रेल्वे मार्गावर अपघात : राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे चाक घसरले

कोकण रेल्वेवर दरड कोसळली 

Updated: Jun 26, 2021, 07:15 AM IST
कोकण रेल्वे मार्गावर अपघात : राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे चाक घसरले  title=

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर भोके उक्षी दरम्यान बोल्डर कोसळल्यान राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे चाक घसरून अपघात झाला आहे. यामुळे कोकण रेल्वेची संपूर्ण वाहतूक थांबली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या अनेक स्थानकांवर थांबविल्या आहे. (Konkan Railway Accident : The engine wheel of Rajdhani Express slipped) राजधानी एक्सप्रेसचे इंजिन मार्गावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

कोकण रेल्वेच्या मार्गावर भोके ते उक्षी दरम्यान बोल्डर मार्गावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वहातुक थांबली आहे. ही घटना आज सकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी ट्रेन धावत होती.

 या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटना स्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटने मध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.