कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील रेडे डोह फुटला, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर

जिल्ह्यातील अनेक गावाच थेट संपर्क तुटलाय. पण या गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे

Updated: Aug 3, 2019, 10:00 AM IST
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील रेडे डोह फुटला, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीरच बनत चाललीय. पंचगंगा नदी सध्‍या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत असून कोल्हापूर - पन्हाळा मार्गावरील रेडे डोह फुटलाय. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होताना दिसतेय. 

पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. सध्या पंचगंगा नदी ४३ फूट ८ उंचावरून वाहतेय. जिल्ह्यातील अनेक गावाच थेट संपर्क तुटलाय. पण या गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे. 

जिल्ह्यातील सर्वच धरण १०० टक्के भरली असून राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यामधून ७ हजार ११२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी आलं असून प्रशासनाने अनेक ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत केलंय.