'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीक नको'; संभाजीराजेंची तावडेंवर टीका

विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Updated: Aug 20, 2019, 09:02 PM IST
'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीक नको'; संभाजीराजेंची तावडेंवर टीका title=

कोल्हापूर : विनोद तावडेंनी पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरून मदत जमा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावरून विनोद तावडेंवर टीका केली आहे. 'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही.' असं ट्विट संभाजीराजेंनी केलं.

कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विनोद तावडे रस्त्यावर उतरले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तावडे नागरिकांना आवाहन करत होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संभाजीराजेंनी यावर आक्षेप घेतले आहेत.

यानंतर आम्ही छत्रपती संभाजीराजेंशी संपर्क साधला, पण आपल्याला हे प्रकरण पुढे न्यायचं नाही. माझी जी प्रतिक्रिया होती, ती मी ट्विटवर व्यक्त केली आहे, असं संभाजीराजे म्हणाले.