कोल्हापूर : विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चांगलाच चोप दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी इथं ही घटना घडलीय. सुनील कांबळे हा शिक्षक पाचवीत शिकणाऱ्या मुलींचा वारंवार विनयभंग करत होता. याबाबत मुलींनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यानंतर त्याला कडक सूचनाही देण्यात आल्या होत्या. तरीही हा प्रकार थांबला नाही. त्यानंतर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
पालकांना हा प्रकार कळाल्यानंतर ३०० हून अधिक पालकांनी शाळेत धाव घेत नराधम सुनील कांबळेला चांगलाच चोप दिला.
या घटनेची नोंद कागल तालुक्यातील मुरगुड पोलिस स्टेशनमधे झाली असून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय.