उठाबशाची शिक्षा : 'त्या' विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत हलविणार

जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या पीडित विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत आणलं जाणार आहे. 

Updated: Dec 15, 2017, 04:01 PM IST
उठाबशाची शिक्षा : 'त्या' विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत हलविणार title=

कोल्हापूर : जिल्ह्यातल्या चंदगडमधल्या पीडित विद्यार्थिनीला उपचारासाठी मुंबईत आणलं जाणार आहे. 

शाळेत वही आणायला विसरल्याचा क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थिनीला, कानूर बुद्रुक इथल्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ शाळेची मुख्याध्यापिका अश्विनी देवणे यांनी तब्बल 500 उठावशा काढायचा आदेश दिला होता.

 या मुलीनं 300 उठाबशा काढल्या आणि ती कोसळली. त्यानंतर आजतागायत तिचे पाय लटपटतायत. तिला चालता येत नाही. 24 नोव्हेंबरची ही घटना आहे.

दरम्यान पीडितेच्या तपासणीचे सर्व रिपोर्ट नॉरमल आहेत. आता निरोफिजिशन सल्ल्यानं तिच्यावर मुंबईत उपचार होणार आहेत.