कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील मोठा पूल खचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोन राज्यांना जोडणारा मार्ग सुरु होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या बारा दिवसांपासून पुरामुळे हा मार्ग बंद होता. त्यात आता पूल खचल्याने आणखी काही दिवस या मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. हा पूल सुमारे सत्तर वर्ष जुना आहे. पूर्वीही एकदा हा पूल खचला होता. त्यावेळी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर जगबुडी नदीवरीलही पूल खचल्याने धोका वाढला आहे. दरम्यान, लहान वाहनांसाठी मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. नाट्यमय घडामोडीनंतर छोट्या वाहनांसाठी हा पूल सुरु करण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरचा जगबुडीवरचा नवीन पुल ऐन पावसाळ्यात खचल्याने वाहनधराकांचा मोठा खोळंबा झाला होता. मात्र हा पुल सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीने आठ दिवसांपुर्वी अल्टिमेटम दिले होते.
पुल छोट्या वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो का? याचा आढावा राष्ट्रवादीकडून घेण्यात आला होता.पावसाच्या सुरुवातीलाच हा पूल खचल्याने पुरपरिस्थितीत देखील वाहतूक ठप्प झाली होती.