कोल्हापूर : महापुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत मिळण्याऐवजी ती भलत्याच लोकांना मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून गावागावांमध्ये वादावादी झाली. कोल्हापुरातील शिरोळच्या नवे दानवाड गावात तुंबळ हाणामारी झाली. खऱ्या पूरग्रस्तांना डावलल्याने संताप अनावर झाला आणि या संतापाचे रुपांतर हाणामारीत झाले.
रग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत आली. मात्र गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्याच खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कोल्हापूर, सांगलीच्या महापुरानंतर पूरग्रस्तांसाठी मदतीचे लाखो हात पुढे आलेत. मात्र हे सगळे मदतकार्य सुरू असताना पूरग्रस्तांची मदत लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील हा प्रकार पुढे आला.
पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाटपावरून गावागावांमध्ये वादावादीचे प्रसंग पुढे आला आहे. शिरोळच्या जुने दानवाड गावामध्ये तुंबळ हाणामारी झाली. खऱ्या पूरग्रस्तांची नावे डावलून भलत्याच लोकांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. रेशन दुकानाचा परवाना असलेला आणि संस्थेचा सेक्रेटरी असलेल्या प्रकाश तिपन्नवार याच्या घरावर चालून संतप्त ग्रामस्थ गेले. तिपन्नवार यांच्या सांगण्यावरून तलाठ्याने पूरग्रस्तांची यादी बनवल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ आणि तिपन्नवार कुटुंबिय यांच्यामध्ये यावरुन जोरदार हाणामारी झाली.