कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल होतं. आज सकाळी वातवरण निवळत असलं, तरी जिल्ह्यात काही ठिकाणी तणाव कायम आहे.
बंदच्या आंदोलनामध्ये तब्बल ८०० हुन अधिक गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. तर पोलीस उपाधिक्षकांसह ६० हुन अधिक जन जखमी झालेत, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी अनेक अज्ञात व्यक्तींच्या विरोधात शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्याच काम सुरु आहे.
पोलसांना लाठीचार्ज बरोबरच काही ठिकाणी हवेत फायरिंग करावं लागलं होतं. दरम्यान रात्री देखील काही ठिकाणी तनावग्रस्त स्थिती होती. त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जिल्ह्यातील बिघडलेली परिस्थीती पुर्वपदावर आली असुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये याची खबरदारी प्रशासन घेत आहे. सकाळपासून एसटी सेवाही सुरू झाली आहे.