कोकण रेल्वे मार्गावर २१ नवी स्थानके होणार

धुरांच्या रेषात हवेत काढत, नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या कोकण रेल्वेबद्दल एक चांगली बातमी. कोकण रेल्वे मार्गावर नवी २१ स्थानकं होणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 19, 2018, 11:45 PM IST
 कोकण रेल्वे मार्गावर २१ नवी स्थानके होणार  title=

मुंबई : धुरांच्या रेषात हवेत काढत, नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या कोकण रेल्वेबद्दल एक चांगली बातमी. कोकण रेल्वे मार्गावर नवी २१ स्थानकं होणार आहेत.

 कोकणासह कानडी माणसाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.   रोहा ते ठोकूर या ७४१ किमी मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामानं वेग घेतलाय. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर आता ३ वर्षानंतर धुरांच्या रेषा दिसणार नाहीत.

कर्नाटकातल्या उडपीजवळची सहा ते सात गावं कोकण रेल्वेला जोडली जाणार आहेत. उडपी ते पडबिद्री दरम्यानच्या स्थानकाचं काम सध्या सुरू आहे.

या नव्या २१ स्थानकांमुळे कोकण रेल्वे मार्गावरच्या स्थानकांची संख्या ८७ होणार आहे. तसंच कोकण रेल्वेचा वेग वाढून ती आणखी सुसाट होणार आहे. शिवाय कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे डिझेलवरच्या खर्चात ३०% बचत होणार आहे.