Kokan Railway Time Table: उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर चाकरमानी गावी जाण्याचा बेत आखतात. अशावेळी गाड्यांना अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उन्हाळ्याच्या हंगामात कोकण रेल्वे विविध मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 7 एप्रिल ते 6 जून या कालावधीत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
मार्च महिन्याच्या अखेरापर्यंत बहुंताश शाळा व कॉलेजच्या परीक्षा संपत आल्या आहेत. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर अनेकजण गावी जातात किंवा बाहेर फिरायला जातात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग दिसून येत आहे. त्यामुळं उन्हाळ्यात चारमान्यांची धावपळ होऊ शकते. नियोजित मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्रवाशांची हैराणी थांबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन (09057) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी चालवली जाणार आहे.
उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन (09057) ही गाडी 7 एप्रिल ते 5 जून या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि रविवारी उधना जंक्शन येथून रात्री 8 वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी सांयकाळी 7 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन-उधना जंक्शन (09058) ही विशेष द्विसाप्ताहिक गाडी 8 एप्रिल ते 6 जून यादरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चालवली जाणार आहे.
उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव या स्थानकांवर थांबेल. ही गाडी एकूण 23 डब्यांची असून त्यात तीन वातानुकूलित कोच असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.