अमित जोशी, झी मीडिया मुंबई : फक्त मुंबईपुरती असणारी मेट्रो आता मुंबईबाहेरही जाळे पसरवणार आहे. आज म्हणजेच १८ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो-५ आणि मेट्रो-९ चं भूमीपूजन करणार आहेत.
मेट्रो - ५ म्हणजेच ठाणे - भिवंडी - कल्याण हा एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. यामुळे लोकलच्या रखडमपट्टीला वैतागलेल्या आणि वेळखावू रस्ते वाहतुकीने पिचलेल्या एका मोठ्या भागाला थेट मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
- मेट्रो-५ चा एकूण मार्ग २४.९ किलोमीटरचा असणार आहे
- एकूण १७ मेट्रो स्थानकं यामध्ये असणार आहेत
- ८ हजार ४१६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे
- कापूरबावडी, बाळकूम नाका, अंजुरफाटा, धामणकर नाका, भिवंडी, रंजोली गाव, दुर्गाडी, कल्याण स्टेशन या मार्गावरचे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.
तर लोकलमध्ये अत्यंत गर्दी असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर या रेल्वे मार्गाला समांतर मेट्रो-९ ची उभारणी केली जाणार आहे. विशेषतः या मेट्रो मार्गामुळे लोकल सेवेला थेट मेट्रोचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
- दहिसर ते मीरा भाईंदर अशी साडे दहा किलोमीटरची ही मेट्रो असणार आहे
- त्यामध्ये ११ स्थानकं असणार आहेत
- सुमारे ४५०० कोटींचा हा प्रकल्प आहे. पांडुरंग वाडी, साईबाबा नगर, सुभाष चंद्र बोस स्टेडियम, इंद्रलोक या मार्गावरचे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.
या प्रकल्पांचे एकीकडे भुमीपूजन केलं जात असतांना यो दोन्ही मेट्रो मार्गाच्या निविदी प्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी या मार्गावर प्रत्यक्ष काम सुरु झालेले असेल आणि अर्थात राजकीय पक्षांमध्ये श्रेयाची लढाईसुद्धा...