मुंबई :दर दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असून सलग चौथ्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केलीये. मुंबईत आज पेट्रोलचे दर 94.64 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 84.94 रुपये प्रति लीटर आहे.
आज परभणी येथे 97 रुपये 10 पैसे प्रति लिटर एवढा पेट्रोलचा दर आहे. तर डिझेल प्रति लिटर 86 रुपये 49 पैसे प्रति लिटर प्रमाणे विकल जातंय. इतिहासात पहिल्यांदाच साधं पेट्रोल 97 रुपयांच्या पुढे गेलंय. तर एक्स्ट्रा पॉवरच पेट्रोल शंभरीच्या जवळ जाऊन पोहोचलय.
आज परभणीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचे दर 99 रुपये 88 पैसे प्रति लिटरवर जाऊन पोहोचलेत,त्यामुळे लवकरच पेट्रोल आता शंभरी पार करेल असं दिसून येतंय. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर लावलेली शुल्क कपात करण्यासही नकार दिल्याने पेट्रोल लवकरच शतक पार करेल असं दिसतेय.
पण वाढत्या इंधनाच्या दरामुळे वाहन धारकांच्या खिशाला मात्र कात्री लागतेय,परिणामी परभणी येथील वाहतूक व्यवस्था महागलीये. शहरातील ऑटो धारकांनी 10 रुपयावरून 15 रुपये एवढा प्रति सीट दर केलाय,राज्यभरात या दरवाढीचा भडका वाहन धारकांना सोसावा लागतोय.