खेड शिवापूर टोल नाक्यावर भामट्यांची विनापावती वसूली; जबाब विचारल्यास प्रवाशांना शिवीगाळ

  पुणे - सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्यावर एका प्रवासी कुटूंबाला अडवून मुजोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 

Updated: Apr 3, 2021, 11:12 AM IST
खेड शिवापूर टोल नाक्यावर भामट्यांची विनापावती वसूली; जबाब विचारल्यास प्रवाशांना शिवीगाळ title=

पुणे :  पुणे - सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्यावर एका प्रवासी कुटूंबाला अडवून मुजोरी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 

टोल कर्मचाऱ्यांनी टोलची पावती न देता, पैसे घेतल्यावरून हा वाद सुरू झाला. कुटूंबाने टोलची पावती मागितल्याने टोलवरील मुजोर कर्मचाऱ्यांनी वाहनात बसलेल्या कुटूंबियांशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यातील एकाने कारमधील महिलेवर हात उचलला. तसेच शिवीगाळही केली. 

दोन दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या  त्या म्हणतात की,' ही कसली दादागिरी चालू आहे खेड शिवापूर टोल नाक्यावर, हा प्रायव्हेट टोल कुठला आणि कुणाचा ? १९० रू.द्या पण पावती देणार नाही म्हणतात पोलिसांनाही घाबरत नाही करा तक्रार म्हणताहेत. ही टोळी कुणाची व कुणासाठी वसूली चालू आहे? लक्ष द्या'.

हा संपूर्ण प्रकार प्रवाशांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानं उघड झाला.. महिलेशी गैरवर्तन करणा-या दोन कर्मचा-यांना कामावरुन काढल्याचं टोल नाका प्रशासनानं सांगीतलं. मात्र अद्याप याप्रकरणी  कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही...