कळमोडी धरण ओवर फ्लो, पुर्ण क्षमतेने भरलेले जिल्ह्यातील पहीले धरण

भिमाशंकर परिसरात जोरात पावसाचे आगमन झाल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. 

Updated: Jul 11, 2019, 08:50 AM IST
कळमोडी धरण ओवर फ्लो, पुर्ण क्षमतेने भरलेले जिल्ह्यातील पहीले धरण title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : सह्याद्री पर्वत रांगामधुन येणाऱ्या पाण्यावर खेड तालुक्‍यात कळमोडी,चास-कमान,भामा-आसखेड ही तीन धरणे बांधण्यात आली असुन या पाण्याचा वापर पिण्याचे पाणी व शेतीसाठी असा वापर केला जातो. मागील पंधरा दिवसांपासुन भिमाशंकर परिसरात जोरात पावसाचे आगमन झाल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे कळमोडी हे धरण आज पहाटेच्या सुमारास ओव्हफुल झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के भरणारे कळमोडी हे पहिले धरण आहे. कळमोडी हे धरण आरळा या नदीवर असुन आता ही नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गुरुवारी कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले. 1.51 टीएमसी पाणी साठा या धरणात आहे. धरण भरल्याने त्यावरून सुमारे शंभर क्‍युसेस वेगाने पाणी खाली कोसळत असल्याने आरळा नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नदीचे पाणी आता चास-कमान धरणात येत असुन चास-कमान धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.चासकमान धरणात ३० टक्के इतका पाणी साठा उपलब्ध झाला आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरी वर्गात दिलासा मिळणार असल्याने शेतकरी आनंदीत आहेत.

धरणातील पाणीसाठा आणि पावसाची आकडेवारी

एकूण पाणी पातळी 682.70 दशलक्ष घनमीटर

एकूण साठा 33.75 दशलक्ष घनमीटर

उपयुक्त पाणीसाठा 32.16 दशलक्ष घनमीटर

टक्केवारी 100 टक्के

धरणातील पाणी क्षमता 1.51 टीएमसी