मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 8 तासानंतर सुरळीत

 मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पुर्वरत सुरू करण्यात आली आहे. 

Updated: Jul 11, 2019, 08:08 AM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 8 तासानंतर सुरळीत title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पुर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.

काल उत्तर रत्नागिरीला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे जगबुडी आणि वशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यानंतर खेड येथे जगबुडीच्या पुलाजवळ वाहतूक बंद करण्यात आली. होटी तर चिपळूणच्या वशिष्टी नदीवरील पुलाजवळ वाहतूक बंद करून ही वाहतूक गुहागर बायपासमार्गे वळवण्यात आली होती. मात्र दोन्ही नद्यांचे पाणी ओसरल्यावर अखेर 8 तासानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली. 

वाहतूक बंद असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि खेड येथील मदत ग्रुपने शर्थीचे प्रयत्न केले आणि पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली.