Pune Bypoll Election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींची घोषणा केली आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निवडणुकींच्या (EC Announce Poll Dates For Nagaland Meghalaya Tripura Legislative Assemblies) घोषणा करतानाच पुण्यामधील (Pune) कसबा पेठ (Kasba peth bypoll) आणि पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad bypoll) मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली. या पोटनिवडणुकींसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी आहे.
कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर दोन्ही मतदरासंघांमधील जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांवर आता पोटनिवडणुका पार पडणार आहेत.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. मुक्ता टिळक बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी-चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं 3 जानेवारी रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ५९ वर्षीय जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने सर्व पक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला होता.
या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणुकांबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु होती. आज निवडणूक आयोगाने यासंदर्भातील घोषणा केल्याने येथील निवडणुकांमध्येही कोणाला उमेदवारी मिळते की निवडणुकी बिनविरोध होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी कसबा पेठ मतदारसंघातून पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुखांनी रुपाली यांच्या विधानावर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देताना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भातील विधान केलं होतं. त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघांमध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोणते उमेदवार दिले जातात, महाविकास आघाडीकडून या निवडणुकीमध्ये उमेदवार दिले जातात की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमने-सामने आलेले असतानाच या निवडणुकीची घोषणा वाढल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.