Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा

Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. (Kasba Peth Assembly By-Election) या निवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे.

Updated: Feb 3, 2023, 12:19 PM IST
Kasba  Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर, 'या' नावांची आता चर्चा title=
Kasba Peth Assembly By-Election

Maharashtra Kasba Peth Assembly By-Election : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून (Kasba Peth Assembly By-Election) टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. (Political News in Marathi) दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra News in Marathi)

भाजपकडून 'या' नावांची चर्चा

सुरुवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होती. पण शहर भाजपने प्रदेश भाजपकडे पाच नावं पाठवली आहेत. त्यात टिळक पितापुत्रांसह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बीडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. 

पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवाराची घोषणा अपेक्षित असतानाच भाजपने कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची खेळी खेळली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांची कसब्याच्या उमेदवारीवरील दावेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे. 

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का

दरम्यान, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचं चित्र आहे. 

अमरावतीमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर होता. तिथे अजूनही मतमोजणी सुरू आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा मात्र भाजपने जिंकून महाविकास आघाडीवर मात केली. नाशिकमध्ये अपेक्षेप्रमाणे अपक्ष सत्यजित तांबे यांनी २९ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. मराठवाडय़ाची जागा राष्ट्रवादीने कायम राखली आहे. 

अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अजून सुरुच आहे. दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल मध्यरात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यासमोर जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजप उमेदवार रणजीत पाटील मतमोजणी केंद्राबाहेर निघून गेले.