कर्नाटकची दडपशाही, महाराष्ट्राच्या नेत्यांना प्रवेश बंदी

कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे. 

Updated: Nov 13, 2017, 12:28 PM IST
कर्नाटकची दडपशाही, महाराष्ट्राच्या नेत्यांना प्रवेश बंदी title=

बेळगाव : कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे. 

नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना

महामेळाव्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिल्यामुळे आजच्या महामेळाव्याकडे सगळ्यांच लक्ष लागुन राहिलं आहे.

बेळगावमध्ये येण्यास प्रवेश बंदी

दरम्यान कर्नाटक सरकारनं दडपशाही करत महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्यास प्रवेश बंदी घातली आहे. वादग्रस्त सीमाभाग कर्नाटकाचाच आहे, असं भासविण्यासाठी कर्नाटक सरकार गेल्या काही वर्षापासुन बेळगावात विधीमंडळ अधिवेशन भरवत. 

अधिवेशनाला आज बेळगावमध्ये सुरुवात

यंदाच्या या अधिवेशनाला आज बेळगावमध्ये सुरुवात होणार आहे. त्याविरोधात दरवर्षी महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी जनतेचा महामेळावा आयोजित करते. 

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण

आजच्या या महामेळाव्याला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय. त्यानुसार आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि धनंजय महाडिक या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावात उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करण्याचा आदेश दिल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. 

पवार-भुजबळ वेशांतर करून होते उपस्थित

1986 साली कन्नडसक्‍ती विरोधी आंदोलनात शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी बंदी आदेश झुगारला. वेशांतर करून बेळगावात दाखल झाले. त्यावेळी ते आंदोलन मोठे गाजले होतं. 

नेत्यांना प्रवेश बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दरम्यान, आजच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यानी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये येण्यास प्रवेश बंदी आदेश केलाय. १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पासून ते १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे.