मुंबई : कल्याणमधील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी (Vijay salvi) यांना पोलिसांकडून तडीपारची नोटीस बजावली आहे. ठाणे ,बृहन्मुंबई, आणि रायगड या जिह्यातून 2 वर्षासाठी तडीपार का करण्यात येऊ नये नोटीसमध्ये पोलिसांनी विचारणा केली आहे. तर या अन्यायकराक कारवाईला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं विजय साळवी यांनी सांगितले आहे.
कल्याणमधील शिवसेनेचे मोठे नेते असलेले विजय साळवी यांना नोटीस बजावल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता विजय साळवी हे काय भूमिका घेतात याकडे कार्यरर्त्यांचं लक्ष लागलं आहे.