कायदा सुव्यवस्था धाब्यावर, 24 तासात तीन खूनांनी पुणे हादरलं

पुण्यात 24 दिवसात तीन खून झाल्याने खळबळ, आरोपींना पोलिसांचा राहिला नाही धाक?

Updated: Sep 26, 2022, 07:07 PM IST
कायदा सुव्यवस्था धाब्यावर, 24 तासात तीन खूनांनी पुणे हादरलं title=

Pune Crime News : सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात 24 तासांमध्ये तब्बल 3 खून झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवलेली पाहायला मिळत आहे. पोलिसांचा धाक आरोपींना राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. (Pune Crime News) 

वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk Murder) परिसरात प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती. मैत्रिणीसोबत बोलत बसलेला असताना हल्लेखोरांनी मृत नागेश चिंचोळे 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली आणि रोपट्याची कुंडी घालून संपवलं होतं. या हल्ल्यामध्ये नागेशचा जाग्यावरच मृत्यु झाला होता.

डेक्कन पोलीस ठाण्याच्या (Deccan Police Thane) हद्दीत नदीपात्रामध्ये खून करून तरूणाचा मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश कदम (Ganesh kadam) (35, रा. शनिवारपेठ, पुणे) असं खून झालेल्याचं नाव आहे. गणेश कदम हा लाँन्ड्री चालक होता. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खून करण्यात आला होता. 

हडपसरमध्ये रिक्षाचालकाचाही अत्यंत निघृणपणे खून झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या बाचाबाचीनंतर रिक्षा चालक तरूणाला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून घेऊन दगडाने आणि बांबुने मारहाण करत त्याचा निघृण खून करण्यात आला. हा प्रकार हडपसर माळवाडी येथील केशव चौकाजवळी  नारळाच्या बागेजवळ घडला आहे. सागर राहुल गायकवाड (Sagar Gaikwad Murder) असं मृत तरूणाचं नाव आहे.