घोळ झाला! मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, जल्लोष केला पण गाडीतून जे बाहेर आले ते राज ठाकरे नव्हते... काय घडलं नेमकं?

Raj Thackeray: कल्याणमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमा झाले. फटाके फुटले पण ऐनवेळी गाडीतून जे निघाले ते राज ठाकरे नव्हते.

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2024, 05:31 PM IST
घोळ झाला! मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, जल्लोष केला पण गाडीतून जे बाहेर आले ते राज ठाकरे नव्हते... काय घडलं नेमकं? title=
Raj Thackeray Kalyan

Raj Thackeray: आपला नेता एखाद्या समारंभ किंवा कार्यक्रमाला येणार असेल तर सर्वात जास्त आनंद पक्षाच्या कार्यकर्त्याला होत असतो. आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जय्यत तयारी करतात. कल्याणमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमा झाले. फटाके फुटले पण ऐनवेळी गाडीतून जे निघाले ते राज ठाकरे नव्हते. 

कल्याणमध्ये राज ठाकरे येणार आहेत याची माहिती पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते कल्याणमध्ये गोळा झाले. इतक्यात गाडीचा सायरन वाजला. कोणीतरी आवाज दिला राज साहेब आले...त्याने पुढच्याला सांगितलं राज साहेब आले...बघता बघता राज साहेब येणार असल्याची बातमी पसरली...कार्यकर्त्यांना आनंद झाला... त्यांच्या अंगात उत्साह संचारला... 

राज ठाकरेंऐवजी कपिल पाटलांचे स्वागत

इतक्यातच काहीतरी वेगळ घडलं. गाडी आली..त्यातून बाहेर येणारे राज ठाकरे नव्हते. राज ठाकरे समजून आपण केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील यांचे स्वागत केल्याचे मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. पण हे समजायला थोडा उशीर झाला होता. 

स्वागतासाठी उभे असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गाडीच्या सायरनचा आवाज ऐकला होता.  राज ठाकरे आले असे वाटल्याने कार्यकर्ते फटाके वाजून झाले मोकळे झाले होते. 

कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद

काही वेळ असाच गेला..साहेब अजून मागेच आहेत..कोणीतरी सांगितलं..त्यानंत मनसे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले...तोच उत्साह..तोच जल्लोष...राज ठाकरेंची गाडी आल्याचे कळले. फटाके वाजले...कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या...आणि राज ठाकरे गाडीबाहेर आले...कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला...कार्यकर्त्यांनी साहेबांच्या स्वागतासाठी केलेली धावपळ नंतर त्यांनी कोणीतरी सांगेलच पण तुर्तास साहेबांच्या येण्याचा आनंद प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.