Kalicharan Maharaj: कालीचरण महाराज पुन्हा चर्चेत; आता काय केलं हिंदूंना आवाहन?

कालीपुत्र कालीचरण महाराज हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी लव्ह जिहाद विरोधात यवमाळमध्ये काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाचे नेतृत्व केले. 

Updated: Jan 21, 2023, 04:21 PM IST
Kalicharan Maharaj:  कालीचरण महाराज पुन्हा चर्चेत; आता काय केलं हिंदूंना आवाहन?  title=

Kalicharan Maharaj Controversial Statement : कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेस कालीचरण महाराज यांनी आता कोणतेही वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement)केले नाही. तर त्यांनी हिंदू (Hindu) एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. धर्मांतराविरोधात यवतमाळच्या पुसदमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. कालीचरण महाराज यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.  हिंदूंनो जात, भाषा, वर्णवाद सोडून धर्माचे रक्षण करा असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले. 

प्रांतवाद, जातीवाद, भाषा व वर्णवादाचा नाश करून धर्माचं रक्षण करा, हिंदूंनो एकीभूत होऊन व्होटर बँक बना असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले. यवतमाळच्या पुसद येथे हिंदू गर्जना मोर्चाला ते संबोधित करीत होते.  कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार प्रत्येक निवडणुकीत विजयी करा, कारण हिंदू असुरक्षित आहे, त्यामुळे हिंदू म्हणून धाक निर्माण करा असेही आवाहन त्यांनी केले. 

लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, जनसंख्या नियंत्रण ह्या समस्यांवर कायदा व्हावा व त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशा विविध  मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजीत करण्यात आला होता.  या भव्य हिंदू गर्जना मोर्चात पुसदकर हिंदू नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहभागी झाले. व्यासपीठावर बंजारा समाजाचे महंत, वारकरी संप्रदायाचे प्रमुख यांची उपस्थिती होती.

धर्मासाठी खून करणं वाईट नाही - कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य

धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले होते.   आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो कालिचरण महाराज म्हणाले.  हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज यांनी मारामाऱ्या केल्या म्हणून तर आपण त्यांना पूजतो. हिंदू धर्मातील देव देवतांनी आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का असा सवालही कालीचरण महाराज यांनी उपस्थित केला होता. 

कालीचरण महाराजांचा अजब दावा चर्चेत

डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या मग डोकं ठिकाण्यावर येईल, सर्व भूत प्रेम तंत्र मंत्र बाहेर येईल, असा दावा कालीचरण महाराजांनी केला होता.