नागपूरच्या ज्योती आमगेच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

अवघे ६३ सेंटीमीटर म्हणजेच दोन फुट एक इंच उंची असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगेला सोशल मीडियाचा त्रास सहन करावा लागतोय.. 

Updated: Sep 7, 2017, 08:11 PM IST
नागपूरच्या ज्योती आमगेच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा title=

नागपूर : अवघे ६३ सेंटीमीटर म्हणजेच दोन फुट एक इंच उंची असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगेला सोशल मीडियाचा त्रास सहन करावा लागतोय.. 

सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गिनीज बुकात तीची नोंद झालीये.. ज्योती काही वर्षांपूर्वी अमेरिकेत गेली असता भारतीय वंशाच्या एका युवकाने तिच्यासोबत फोटो काढला होता.. तो फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय... त्या युवकासोबत ज्योतीने लग्न केल्याची पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहे... 

जगभरातून या पोस्ट बाबत विचारणा करणारे फोन ज्योती आणि तिच्या कुटुंबियांना येत असल्याने अखेर ज्योतीने नागपूर पोलिसात तक्रार दाखल केलीये.. ही पोस्ट खोटी असून हि पोस्ट पुढे न सरकवण्याची विनंतीही ज्योतीने केली आहे