Sanjay Raut: "दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम...", राऊत बाहेर येताच आव्हाडांचं खास ट्विट!

Jitendra Awhad Tweet on Sanjay Raut : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी खास ट्विट केलं आहे.

Updated: Nov 10, 2022, 01:37 AM IST
Sanjay Raut: "दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम...", राऊत बाहेर येताच आव्हाडांचं खास ट्विट! title=
Jitendra Awhad On Sanjay Raut

Jitendra Awhad On Sanjay Raut : शिवसेनेची मुलखमैदानी तोफ असलेले संजय राऊत (Sanjay Raut) तब्बल 103 दिवसांनंतर पुन्हा राजकारणाच्या मैदानावर परतले आहेत. गेली 103 दिवस संजय राऊत न्यायालयीन कोठडीमध्ये होते. पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊतांना अटक केली होती. मात्र, आता संजय राऊतांचा जामीन मंजूर (Sanjay Raut Bail) झाला आणि संजय राऊत कारागृहातून बाहेर आले. 

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) सुटकेनं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचं दिसतंय. तर राजकीय वर्तुळात देखील वातावरण तापल्याचं दिसतंय. संजय राऊतांच्या सुटकेनंतर भाजप नेत्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी राऊतांचं स्वागत केलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी खास ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- Exclusive Photo: आजचा दिवस संजय राऊतांचा, जेलमधून सुटका ते सिद्धिविनायक... काय काय घडलं, पाहा

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad On Sanjay Raut)  यांनी संजय राऊत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड एकमेकांसोबत (Jitendra Awhad Tweet) दिसत आहे. त्याला आव्हाडांनी एक कॅप्शन देखील लिहलंय. दोस्ती का दम, दिखा देंगे अब हम, असं आव्हाडांनी म्हटलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडी नव्या जोमात मैदानात उतरणार असल्यातचं दिसण्याची शक्यता आहे.

पाहा ट्विट - 

दरम्यान, राऊतांना विशेष PMLA कोर्टाकडून जामीन मंजूरही झाला. या जामिनावर स्थगिती आणण्यासाठी ED ने मुंबई उच्च न्यायायालय धावाही घेतली. मात्र ED च्या याचिकेवर तात्काळ सुनावणी झाली नाही. संजय राऊतांना दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात नवं राऊत 2.0 प्रकरण दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.