Jitendra Awhad Emotional Post: आजपासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, बॉम्बे डाईंगच्या एका इमारतीमध्ये म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला.
शरद पवारसाहेब (Sharad Pawar) ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) ऍडमीट होते. त्यांच छोटसं ऑपरेशन झालं होतं. मी त्यांना बघायला गेलो होतो आणि उभा राहून चर्चा करीत होतो. साहेबांच्या बाजूला वहिनी बसलेल्या होत्या आणि खुर्चीवर टाटा बसले होते. कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. श्रीखंडे बसले होते. सहज चर्चा करीत असताना मी डॉ. श्रीखंडे यांना विचारलं की, मी काय मदत करु शकतो?, असं आव्हाड सांगतात.
मला एक खंत होती जी माझ्या मुलीने माझ्या मनात टाकली होती, ती म्हणजे कॅन्सर हॉस्पिटलच्या (Cancer Hospital) बाहेर रस्त्यावरच लोक झोपतात तर त्यांची योग्य ती सोय का नाही आपण करु शकत? माझ्या मनाला देखील हाच प्रश्न भेडसावत होता, असंही आव्हाडांनी सांगितलं. कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावरच लोक झोपतात, त्या लोकांसाठी आपण काय करु शकलात तर बघा, असं डॉ. श्रीखंडे (Dr. Shrikhande) यांनी आव्हडांना (Jitendra Awhad) सांगितलं.
अधिकाऱ्यांना बोलावलं, बैठकी घेतल्या, निश्चय केला आणि त्यानुसार कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खोल्या अगोदर दुसरीकडे उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तीनही अधिकाऱ्यांसहीत सर्वांनीच एकमताने या निर्णयाचे स्वागत केलं, हे समाजासाठी उपयोगी काम आहे, असंही आव्हाड अभिमानाने सांगतात. अनेक संकटे येतात काही ठिकाणी माहित नसलेली माणसं देवासारखी येऊन उभी राहतात, असंही आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.
आणखी वाचा - आत्महत्या की घातपात? जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचं शेवटचं WhatsApp Status चर्चेत
माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने (Cancer) गेलेली मला आठवते. कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्यानंतर घरात काय अवस्था असते, हे मी फार जवळून माझ्या घरात बघितलं आहे. कारण, माझ्या तीन मावश्या कॅन्सरने गेल्या. एक माझी मावशी टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमीट असताना माझी आई कशी रस्त्यावर झोपायची ही आठवण देखिल माझ्या मनात आजही कायम आहे, असं म्हणत त्यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.
*हेच आशिर्वाद कामी येतात*
आज पासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात होणार आहे. आज 11.00 वाजता टाटा कॅन्सरच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आदरणीय शरचंद्रजी पवार साहेब ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट होते.…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 28, 2023
दरम्यान, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये (Tata Cancer Hospital) उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खोल्या असोत, काम करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल असो तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल असो, ही तिनही म्हाडाच्या अखत्यारीत नसतांना म्हाडाचा छत्र देण्यासाठी (समाजोपयोगी उपक्रम) म्हणून उपयोग व्हावा म्हणून ही तिन्ही कामे झाली. हाजीअलीच्या जवळ जे महिलांसाठी आपण वर्किंग वुमन्स हॉस्टेल तयार करणार आहोत त्या कामाची देखील आपण सुरुवात करावी, असं आवाहन आव्हाडांनी राज्य सरकारला केलं आहे.