भारतीय जनता पक्षाविरोधात जयश्री वनगांंची तक्रार

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

Updated: May 20, 2018, 09:07 PM IST
भारतीय जनता पक्षाविरोधात जयश्री वनगांंची तक्रार  title=

 

पालघर : दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटो आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयश्री वनगा यांनी केलाय. त्याचबरोबर भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणीही केलीय.  भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर  बहुतेक ठिकाणी चिंतामण वनगा यांच्या छायाचित्रांचा उपयोग केला जातोय...  याबाबत माझी किंवा वनगा कुटुंबीयांची कुठलीही लेखी परवानगी भाजपच्या कोणत्याही नेता किंवा पदाधिकाऱ्याने घेतली नाही. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असून, भाजपवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केलीय...  

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या फोटो आणि नावाचा भाजपकडून गैरवापर केला जात असल्याचा आरोप जयश्री वनगा यांनी केला असून, भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या निवडणूक प्रचार साहित्यावर  बहुतेक ठिकाणी माझे पती दिवंगत चिंतामण वनगा यांच्या छायाचित्रांचा उपयोग केला जात आहे. याबाबत माझी किंवा वनगा कुटुंबीयांची कुठलीही लेखी परवानगी भाजपच्या कोणत्याही नेता किंवा पदाधिकाऱ्याने घेतली नाही. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असून, भाजपवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, ही विनंती.", असे जयश्री वनगा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच, केवळ मतांची भीक मागण्यासाठी भाजपकडून हा निंदनीय प्रकार केला जात असल्याची टीकाही जयश्री वनगांनी केली.

भाजपकडून कुठेही आणि कोणत्याही प्रचार साहित्यावर माझ्या पतीचे फोटो किंवा नाव वापरले व छापले जाऊ नयेत, अशी सक्त ताकीद द्यावी. अन्यथा मला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल, असा इशाराही जयश्री वनगा यांनी दिला आहे.