शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय....शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय.

Updated: Aug 14, 2017, 07:00 PM IST
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह title=

शिर्डी : देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय....शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही हा उत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतोय.

साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कैन्हय्याचं गुणगान केलं जातं..रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आली़..साईबाबांना श्रीकृष्णाचा अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य भाविक साईदरबारी हाजार झालेत.  

सकाळपासून साई मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेय...साई संस्थांच्या वतीने साई मंदिर परिसर तसेच साई समाधी मंदिर - गुरूस्थान मंदिर साईची द्वारकामाई विविध आणि रांगोळी रंगी फुलांनी सजवण्यात आलीय..आज गोपालकाल्याच्या दिवशी दिवसभर साईसमाधी वर गोपाल कृष्णाचा फोटो ठेवुन त्याची पूजा केली जाते.