Mahashivratri 2023 : आधुनिक श्रावणबाळ! वडिलांना हेलिकाॅप्टरमधून घडवलं महादेवाचं दर्शन

हेलिकाॅप्टरमधून गावाकडील महादेवाचं दर्शन करण्याची वडिलांची ईच्छा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी पूर्ण केली आहे. 

Updated: Feb 18, 2023, 03:45 PM IST
Mahashivratri 2023 : आधुनिक श्रावणबाळ! वडिलांना हेलिकाॅप्टरमधून घडवलं महादेवाचं दर्शन title=

नितीश महाजन, झी मीडिया, जालना : देशभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) उत्साह पहायला मिळत आहे. महाशिवरात्री दिवशीच भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. यामुळे या दिवशी शंकर पावर्तीचे आशिर्वीद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळत. अशाच भाविकांच्या गोंधळात आधुनिक श्रावणबाळाचे दर्शन घडले आहे. या आधुनिक श्रावणबाळाने आपल्या वडिलांची स्वप्नपूर्ती केली आहे.  वडिलांना हेलिकाॅप्टरमधून महादेवाचं दर्शन घडवलं आहे. भाजप प्रवक्ते विनोद वाघ (Jalna BJP spokesperson Vinod Wagh) यांंनी महाशिवरात्री निमित्ताने वडिलांना हेलिकाॅप्टर वारी घडवली आहे (darshan of Mahadev from a helicopter on the occasion of Maha Shivatri). 

हेलिकाॅप्टरमधून गावाकडील महादेवाचं दर्शन करण्याची वडिलांची ईच्छा भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी पूर्ण केली आहे. जालना जिल्ह्यातल्या नेर येथे वटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या गावात विनोद वाघ यांच्या वडिलांचे संपूर्ण आयुष्य गेले. विनोद वाघ यांचे वडिल शिक्षक होते. संपूर्ण आयुष्य त्यांनी याच गावात ज्ञान दानाचे कार्य केले. त्यामुळं यंदाच्या महाशिवरात्र निमित्त वडिलांना हेलिकाॅप्टरमधून महादेवाचं दर्शनं घडवायचं अशी इच्छा विनोद वाघ यांची होती.

अखेर वाघ यांनी वडिलांना हेलिकाॅप्टरध्ये बसवून वडिलांना वटेश्वराचं दर्शन घडवलं. शिवाय हेलिकॉप्टरमधून महादेवाच्या मंदिरावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. दरम्यान गावात हेलिकाॅप्टर येत असल्यानं बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.