जळगाव : महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय सर्वस्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर अवलंबून असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यानं केवळ शासकीय कामांचा पाठपुरावा करण्यासाठी दौऱ्यावर येतो, पक्षसंघटन हे बाहेरच्या नेत्यापेक्षा स्थानिक नेत्याला जास्त कळत असते असा टोला हाणत चंद्रकांत पाटील यांनी जळगाव महापालिका निवडणुकीतून एक प्रकारे अंग काढून घेतल्याचं दिसतंय.
शिवसेना आणि सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडी सोबत युती करू नये, असं खडसे समर्थक म्हणतायेत. तर महाजन युती करण्याच्या तयारीत आहेत. तर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मात्र शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचं सांगितलंय.