Jalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

श्वेता चव्हाण | Updated: Feb 7, 2024, 09:25 AM IST
Jalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण title=

Jalgaon sand mafiya crime In Marathi : जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून एका महिन्यात दोन महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता.  याचदरम्यान 6 फेब्रुवारीला रात्री 11 वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद दरम्यान वाळूमाफियांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली. यावेळी हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांचे वाहन देखील फोडले आहे. या हल्ल्यात निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णलायत उपचार सुरू आहेत.

'या' घटनेची पुनरावृत्ती 

काही दिवसांपूर्वीच धरणगाव आणि एरंडोल येथे वाळूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून जळगावच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांसह पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद ते तरसोद दरम्यान घडली आहे.  भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असलेले निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यासह तहसीलदार विजय बनसोडे व चालक यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाच्या पुढे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर अडविण्यात आले. त्यानंतर तहसीलदार बनसोडे हे एक डंपर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना अचानक दुचाकी चार चाकी वरून त्यांनी थेट लोखंडी पाईपच्या साहाय्याने सोपान कासार आणि वाहनावर हल्ला केला. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत सोपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून दोघांना ताब्यात घेतल्याचे माहिती समोर आली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, डॉ. विशाल जैस्वास यांच्यासह पथक जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. पोलिसांनी काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून दोघांचा ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. 

धुळ्यातही तहसीलदारांना मारहाण

वाळूची अवैध वाहतूक करताना पकडल्याचा राग आल्याने शिरपूर येथील तलाठ्यास शिवीगळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत तिघांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी सुरेश तुकाराम ठाकरे यांनी फिर्याद दिली.