Jalgaon | जळगाव महापालिकेत गुलाबरावांच्या नेतृत्वात पुन्हा 'शिवसेना प्लस'

जळगावात (Jalgaon) राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे.   

Updated: Feb 11, 2022, 11:17 PM IST
Jalgaon | जळगाव महापालिकेत गुलाबरावांच्या नेतृत्वात पुन्हा 'शिवसेना प्लस' title=

जळगाव : जळगावात (Jalgaon) राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. जळगावात 4  नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हाती घेतलं आहे. मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत या चारही नगरसवेकांनी प्रवेश केला. यामुळे सभागृह नेते असलेले ललित कोल्हे हे त्यांनी खेळलेल्या खेळीत यशस्वी ठरले आहेत.  या सर्व प्रकारामुळे शिवसेना महापालिकेत बहुमताच्या जवळ पोहचली आहे.  (jalgaon 4 bjp corporators joined shiv sena in the presence of  guardian minister gulabrao patil)

जळगाव महापालिकेत अनेक महिन्यांपासून पक्ष प्रवेशावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. यामुळे राजकीय क्षेत्र ढवलून निघालं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीच्या वेळी भाजपचे 28 नगरसेवक हे गळाला लागले होते. याच्यात जीवावर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या होत्याय. तर भाजप बंडखोर असलेले कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी वर्णी लागली. 

शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.

सेना सत्तेत आली. मात्र यानंतर भाजपने राजकीय डाव खेळला. त्यानुसार 10 नगरसेवकांना आपल्याकडे आणलं. यामुळे शिवसेनेचं बहुमत हे अगदी जेमतेम राहिलं. यामुळे सर्वसामन्यांना फोडफोडीचं राजकारण पाहायला मिळालं. 

आता भाजपात गेलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यासाठी ललित कोल्हे हे सातत्याने प्रयत्न करत होते. कोल्हे हे बंडखोरी केलेल्या नगरसेवकांच्या संपर्कात होते. त्यांची खेळी अखेर यशस्वी ठरली. भाजपात गेलेले 4 नगरसवेक पुन्हा सेनेत परतले.

शिवसेनेत परतलेले ते 4 नगरसवेक 

प्रवीण कोल्हे, मीना सपकाळे प्रिया जोहरे आणि मीनाक्षी पाटील या 4 नगरसवेकांनी पाळधी इथं गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं.