प्रियकरानं कोंडून ठेवलेल्या इराणी तरुणीची अखेर सुटका

आरोपी धनराज मोरारजी हा उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे

Updated: Dec 25, 2018, 04:28 PM IST
प्रियकरानं कोंडून ठेवलेल्या इराणी तरुणीची अखेर सुटका  title=

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क भागातून एका इराणी तरुणीची पोलिसांनी सुटका केलीय. परवीन घेलीची असं या ३० वर्षांच्या इराणी तरुणीचं नाव आहे. परवीन हिला तिच्या भारतीय प्रियकरानंच एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं होतं. गेल्या महिन्याभरापासून ती या भारतीय तरुणाच्या तावडीत सापडली होती. धनराज मोरारजी असं आरोपीचं नाव आहे. तो उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे.

कोंडीत सापडलेल्या या तरुणीला धनराज मोरारजी या तरुणाकडून प्रचंड मारहाणही करण्यात आली. एव्हढचं नाही तर, या इराणी तरुणीचा मोबाईल आणि पासपोर्टही धनराजने स्वतःच्या ताब्यात घेतला होता.

धनराज मोरारजी
धनराज मोरारजी

अखेर सोमवारी धनराज काही वेळासाठी घरातून बाहेर गेल्यानंतर परवीनने आपल्या मैत्रिणीशी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला. या मैत्रिणीने पोलिसांच्या मदतीने परवीनची मुलीची सुटका केली.

पोलिसांनी या तरुणीची सुटका केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला... सततच्या मारहाणीमुळे या तरूणीला ओळखणंही कठीण होत होतं. पोलिसांनी धनराज मोरारजीला अटक केलीय.