पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी  पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस  यांनी  अभिरुप न्यायालयात खुलासा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वेश्या व्यवसायाला (Prostitution Business) देखील डिग्नीटी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

Updated: Dec 20, 2022, 11:09 PM IST
पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस यांचा खुलासा  title=

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister of the state Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) या त्यांच्या रोख ठोक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. अभिव्यक्ती विदर्भीय लेखिका संस्थेच्या वतीने नागपुर(Nagpur) येथे अभिरुप न्यायालय भरवण्यात आले होते. यावेळी अमृता या आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या. काही दिवसांपूर्वी  पुण्यातील बुधवार पेठेत केलेल्या 'त्या' बेधड वक्तव्याबाबत अमृता फडणवीस  यांनी  अभिरुप न्यायालयात खुलासा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वेश्या व्यवसायाला (Prostitution Business) देखील डिग्नीटी मिळाली पाहिजे असे मत व्यक्त केले.

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील बुधवार पेठेत सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत मुलींना कार्ड वाटप करण्यात आले. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी आज बुधवार पेठेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी देविक्री करणाऱ्या महिलांचे प्रबोधन केले तसेच  वेश्या व्यावसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारवं अस बेधडक वक्तव्य केल्याचा आरोप अमृता फडणवीस यांच्यावर आहे. याच आरोपाबाबत अमृता फडणवीस यांनी खुलासा केला.  

वेश्या व्यवसायाला (Prostitution Business) देखील डिग्नीटी मिळाली पाहिजे. त्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे मान सन्मान मिळाला पाहिजे. नवीन वेश्या तयार न होण्याकरता दलालांवर कारवाई झाली पाहिजे. अनेक महिला परिस्थितीमुळे या व्यवसायात ओढल्या जातात. यानंतर त्यांना यातून बाहेर कठीण होत. या महिलांचे राहणीमान सुधारावे यासाठी नियामवली तयार केली गेली पाहिजे. त्यांची मुलांसाठी काही तरी योजना राबवून ते या परिस्थिती पासून दूर राहतील यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे असंही त्या म्हणाल्या. 

अजूनही मी आईंना म्हणजेच माझ्या सासू बाईंना घाबरते असं  अमृता फडणवीस म्हणाल्या. राजकीय प्रवेशाबाबत विचारले असता अमृता फडणवीस म्हणाल्या,  24 तास लोकांसाठी ज्या वेळी देऊ शकेल त्यावेळी मी राजकारणात जाऊ शकेल. सध्या मी तेवढा वेळ लोकांसाठी देऊ शकत नाही.

आपले दोन राष्ट्रपिता आहेत आधी महात्मा गांधी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असं विधानही अमृता फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोपांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना त्यांच्यापेक्षा आपली कमाई जास्त आहे. सामाजिक कार्य हीच देवेंद्रजींची कमाई असल्याचंही अमृता फडणवीसांनी सांगितले.

अमृता फडणवीस या विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. विविध कार्यक्रमांना त्या हजेरी लावतात. याशिवाय त्यांना गायनाची देखील आवड आहे.