बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी एमआयएमने केली ‘ही’ मागणी

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादं रुग्णालय उभं करा, अशी मागणी केली आहे.

Updated: Jan 23, 2018, 01:26 PM IST
बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी एमआयएमने केली ‘ही’ मागणी title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादं रुग्णालय उभं करा, अशी मागणी केली आहे.

रूग्णालय बांधण्याची मागणी

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ही मागणी केली असून ‘हे रुग्णालय खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्मारक ठरेल’, असेही ते म्हणाले. सभेत बोलताना यावेळी त्यांनी पुन्हा एकदा औरंगाबाद शहरातील रूग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला. 

का केली ही मागणी?

ते म्हणाले की, शहरात दोन वर्षापासून रुग्णालयाला जागा मिळत नाही. महिला आणि नवजात बालकांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जागा मिळत नाही. त्यामुळे रुग्णालयाचा प्रस्ताव धूळ खात पडल्याचे जलील यांनी सांगितले. 

स्मारकासाठी जागा आरक्षित

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी सिडको आणि दुधडेरी परिसरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्या जागेवर रुग्णालय उभारण्याची मागणी जलील यांनी केली आहे.

त्यांनीही दिला असता होकार...

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चांगला प्रस्ताव असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर रुग्णालयाच्या जागेसंदर्भातील प्रक्रिया पुढेच सरकली नाही. आज बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी नक्कीच रुग्णालय उभारायचे आदेश दिले असते. हे रुग्णालय खऱ्या अर्थानं स्मारक ठरेल आणि जनहित लक्षात घेता ते करायला हवं, असे मत जलील यांनी मांडले.