Leshpal Javalge Instagram Story: पुण्यातील (Pune) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) थरारक घटना घडल्याचं समोर आलंय. 18 वर्षीय तरुणीवर तरुणानं कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना देखील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाल्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) झाला होता. माथेफिरू तरुणाच्या हल्ल्यातून तरुणी वाचली ती आजूबाजूच्या लोकांमुळे. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं. अशातच आता दाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत असल्याचं दिसतंय.
सकाळी नऊ-साडेनऊची गोष्ट...शंतनु जाधव नावाचा तरुण एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. पुण्यातील त्या पीडित तरुणीची परीक्षा होती. त्यासाठी ती ग्राहक पेठ इथं उतरली. समोरच तिला आरोपी शंतनू दिसला. तिने शंतनूला इग्नोर केलं आणि आपल्या मार्गाने चालत राहिली. शंतनूला तरुणीचा राग आला. शंतूनने बॅगेतून कोयता काढला आणि वार करू लागला. वार चुकवून तिचा मित्र पळून गेला. त्यानंतर त्यानं तरुणीवर वार केला. तेवढ्यात आसपासच्या लोकांनी तरुणीला वाचवण्यासाठी धाव घेतली. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांनी शंतनूचा कोयता आडवण्याचा प्रयत्न केला.
लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय. त्याने अनेक मॅसेजेस देखील येऊ लागले आहेत. अशातच त्याची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. मुलाची आणि मुलीची काय जात होती, असे प्रश्न विचारले जात असल्याचा दावा लेशपालने केलाय. त्यावर त्याने सविस्तर इन्टाग्रामवर स्टोरी देखील लिहिलीये.
मुलीची आणि मुलाची जात कुठली होती, असं मला मॅसेज करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला कीड लागली आहे, असं स्टोरीमध्ये त्याने लिहिलंय.
दरम्यान, राजकीय नेत्यांनी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचं कौतूक केलंय. तर राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी बक्षिस देणार असल्याची देखील घोषणा केली आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या दोन्ही तरुणांचं कौतूक केलंय.