Insta Reels : इन्स्टाग्रामवर 'असा' रिल्स बनवणे नाशिकमध्ये तरुणाला पडले चांगलेच महागात...

Instagram Reels :  इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News) 

Updated: Jan 20, 2023, 12:17 PM IST

Instagram Reels : आजकाल अनेकजण सोशल मीडियावर जास्तच सक्रीय आहेत. काही जण रिल्स बनवत आहेत. ( Insta Reels) मात्र, तुम्ही असे रिल्स बनवत असाल तर तुम्हाला जेलची हवा खाऊ लागू शकते. (Maharashtra News in Marathi) इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. का तरुणाने हातात तलवार घेऊन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवला. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News

सोशल मोडियाचे भूत अनेकांच्या डोक्यावर चढलेले दिसून येत आहे. काहीही व्हिडिओ समाजमाध्यमांत अपलोड करण्यात येत आहेत. नाशिकमधील एका तरुणाने हातात तलवार घेऊन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवला. हा व्हिडिओ नाशिकच्या गुन्हे शाखेच्या हाती लागला.  इन्स्टाग्रामवर तलवार घेऊन रिल्स बनवणाऱ्या त्या तरुणाची नशाच पोलिसांनी उतरवली.

भारत नगर येथे राहणारा 19 वर्षीय संशयित फैजान नईम शेख याने इन्स्टाग्रामवर हातात तलवार घेऊन त्याचा रिल्स बनवत हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी माहिती काढत भारत नगर इथे राहणाऱ्या फैजान शेख याचा शोध घेत त्याला ताब्यात घेत त्याकडून एक तलवार जप्त केली.  

त्याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने ही तलवार भारतनगर येथेच राहणारा संशयित सचिन शरद इंगोले याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यांनतर पोलिसांनी सचिन इंगोले याला देखील ताब्यात घेतले. त्याकडून एक गुप्ती जप्त केली असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांनी दिली आहे.