Mhada lottery 2023 : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो

MHADA Lottery Mumbai 2023 : सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको नवं नवीन योजना आणत असतात. पण या म्हाडा आणि सिडकोचे फार्म भरणं अनेकांना डोक्याला ताप वाटतो. पहिल्यांदाच अर्ज भरताना लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. 

Updated: Jan 20, 2023, 11:36 AM IST
Mhada lottery 2023 : घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो title=
Mhada lottery 2023 MHADA LOTTERY ONLINE APPLICATION FORM how to apply Video in marathi

MHADA LOTTERY ONLINE APPLICATION FORM Video : प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपलं हक्काचं घर असावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको अनेक प्रकल्प घेऊन येतात. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) पुणे विभागात 5,990 परवडणारी घराची जाहिरात काढली आहे. तरदुसरीकडे मुंबईकरांसाठीही आनंदाची बातमी आहे. कोकण मंडळाची (Mhada Konkan Lottery 2023) पावणे पाच हजार घरांसाठी लवकरच सोडत काढणार आहे. (Mhada Lottery 2023) ठाण्यातील ( Thane) विहंग प्रकल्पात 256, तर विरारमध्ये ( Virar) 300 सदनिका असणार आहे. त्यामुळे आता 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे.  त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये जर तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 

पहिल्यांदाच भरतायत म्हाडाचा अर्ज

पण सर्वसामान्यांना म्हाडाचे अर्ज भरताना अनेक प्रश्न पडतात. जर त्यांनी एखादी गोष्ट केली नाही तर त्यांचा फार्म हा रद्द होतो. त्यामुळे म्हाडामध्ये घर घेण्याचे त्यांचं स्वप्न अधुरं राहतं. त्यामुळे पहिल्यांदाच म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Mhada lottery 2023 MHADA LOTTERY ONLINE APPLICATION FORM how to apply Video in marathi)

अर्ज कुठे करायचा?

housing mhada gov in ही म्हाडी अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे रिजस्ट्रेशन करण्यासाठी आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. या रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला इतर माहितीदेखील द्यायची आहे. या सगळ्यानंतर तुम्ही म्हाडामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र ठरता. 

ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे

म्हाडामध्ये अर्ज करताना पहिल्यांदा तुम्ही कुठल्या कोट्यातून आणि गटातून फार्म भरणार आहे ते ठरवा. कारण म्हाडामध्ये सर्वांना न्याय मिळावा म्हणून विभागवारी केली आहे. पत्रकार कोटा, डॉक्टर, स्वंतत्र्यसेनानी असे अनेक विभाग आहेत. त्यानंतर आपल्या पगाराच्या उत्पन्ननुसार त्या गटात अर्ज भरा. 

 

हेसुद्धा वाचा - Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरासाठी नोंदणी करायचीये? पाहून घ्या नवी उत्पन्नमर्यादा

 

आवश्यक कागदपत्रे 

पॅन कार्ड
आधार कार्ड
कॅन्सल चेक
अधिवास प्रमाणपत्र
वाहन चालविण्याचा परवाना
पासपोर्ट फोटो
जन्म प्रमाणपत्र
अर्जदाराच्या संपर्काचे तपशील

कोण अर्ज करु शकतो 

18 वर्षावरील नागरिक म्हाडाचा अर्ज करु शकतो. शिवाय त्याने महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव केलं असावं. 

अडचण आल्याल यांना करा संपर्क

अनेकांना म्हाडाचे अर्ज करताना अचडणी येतात. अशावेळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 02226598924/9834637538 या क्रमांकावर तुम्ही फोन करु शकता. शिवाय 18004250018 क्रमांकावरही संपर्क साधू शकता. 

या तारखा लक्षात ठेवा 

5 फेब्रुवारी - अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

6 फेब्रुवारी- ऑनलाइन पेमेंटचा शेवटचा दिवस

6 फेब्रुवारी- NEFT पेमेंटचा शेवटचा दिवस

13 फेब्रुवारी - ड्राफ्ट अॅप्लिकेशन पब्लिश

15 फेब्रुवारी- फायनल अॅप्लिकेशन

17 फेब्रुवारी - लॉटरी ड्रॉ

20 फेब्रुवारी - रिफंड

हा नियम बदलला 

जर तुमचं लॉटरीमध्ये नाव आलं, त्यानंतर तुम्हाला कागदपत्रं जमा करावी लागतात. पूर्वी जर एखादं कागदपत्र नसेल तर म्हाडा तुम्हाला वेळ द्यायच. पण नवीन नियमाप्रमाणे तुम्हाला दिलेल्या तारखेलाच सगळे कागदपत्रं जमा करायचे आहेत. 

या चुका करु नका अन्यथा...

- तुमचं नाव, पत्ता आणि कामाची माहिती योग्य द्या. कागदपत्रं तपासताना यात तफावत जाणवली तर तुमचा फार्म रद्द होतो. 

- रजिस्ट्रेशन आणि पेमेंट रिसिट दोन्ही डाउनलोड करुन जपून ठेवा. त्याची मेलवर ठेवा आणि हार्ड कॉपीचे अनेक सॉफ्ट कॉपी बनवून ठेवा. ती जर हरवली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. 

- म्हाडाची फाइल करताना, कायम चार फाइल तयार करा. एक बँकेसाठी, दुसरी म्हाडा ऑफिससाठी आणि दोन तुमच्यासाठी...कारण फाइल गहाळ होण्याचा अनेक घटना म्हाडामध्ये नवीन नाही. 

- अतिशय महत्त्वाचे ऑरिजनल डॉक्युमेंट आणि  झेरॉक्सचीही ट्रू कॉपी किंवा सेल्फ अटेस्टेड करून ठेवा. 

म्हाडाच्या लॉटरीचे परतावा धोरण

जर तुम्हाला म्हाडाचे घर लागलं नाही तर अर्जदाराने केलेली रक्कम सात कामकाजाच्या दिवसांत परत मिळते. तुम्ही म्हाडाच्या वेबसाइटवर तुमच्या प्रोफाइलमध्ये लॉग इन ती तपासू शकता.