Kisan Long March: शेतकरी मोर्चावर ठाम, किसान सभेसोबत होणारी सरकारची बैठक पुढे ढकलली

Kisan Morcha at Vidhan Bhavan : किसान सभेसोबत आज होणारी बैठक सरकारकडून पुढे ढकलण्यात आलीय. (Kisan Sabha Morcha)  या प्रकारामुळे किसान सभेचे नेते संतप्त झाले आहेत. शेतक-यांचा निर्धार पक्का आहे, आम्ही मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असं किसानसभेचे नेते अजित नवले यांनी म्हटले आहे. 

Updated: Mar 14, 2023, 10:12 AM IST
Kisan Long March: शेतकरी मोर्चावर ठाम, किसान सभेसोबत होणारी सरकारची बैठक पुढे ढकलली title=

Kisan Morcha at Vidhan Bhavan : किसान सभेसोबत आज होणारी बैठक सरकारकडून पुढे ढकलण्यात आलीय. (Kisan Sabha Morcha) शिष्टमंडळाला आज मुंबईत चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र आता ही बैठक आज होणार नाही असा निरोप देण्यात आला आहे. ही बैठक कधी होणार याबाबतही कोणताही निरोप देण्यात आलेला नाही. (Kisan Sabha Long March) या प्रकारामुळे किसान सभेचे नेते संतप्त झाले आहेत. शेतक-यांचा निर्धार पक्का आहे, आम्ही मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असं किसानसभेचे नेते अजित नवले यांनी म्हटले आहे. सरकारने बैठक पुढे ढकलल्यावर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी किसान सभेची थोड्याच वेळात बैठक होत आहे. 

शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर नाही. शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कांद्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. (Onion issue) तसेच कांदा निर्यात बंदीवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार आता आंदोलन सुरु आहे. किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे. सरकार गंभीर नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

 किसान सभेचा पुन्हा एकदा एल्गार, शेतकरी मुंबईत विधानभवनावर धडकणार

 किसानसभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावर लाँग मार्च (Farmers Morcha) काढत आहेत. नाशिकहून हा शेतकऱ्यांचा मोर्चा पायी निघाला आहे.  हजारो कष्टकरी, कामगार  रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर धडकणार आहे. दरम्यान, माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात गेल्यावेळी या आंदोलनाने शिंदे - फडणवीस सरकारच्या अडचणी वाढवल्या होत्या. मात्र गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करुन हे आंदोलन नाशिक जिल्ह्यातच रोखले होते. आता मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शेतमालाला अत्यल्प भाव, वनजमिनींचा प्रश्न, गॅस दरवाढ यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्यावतीने मुंबईत विधान भवनावर धडक देण्यासाठी रविवारी दिंडोरी येथून निघालेला मोर्चा सोमवारी नाशिक येथे पोहोचला. शेतमालाला भाव मिळत नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी शहरातील बस स्थानकासमोर रस्त्यावर भाजीपाला फेकला. त्यानंतर आता मोर्चा पुढे निघाला आहे.