अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नोटीशीला इंदुरीकरांचं उत्तर

ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या सम-विषय वादग्रस्त वक्तव्यावर अखेर जिल्हा शल्यचिकित्सक

Updated: Feb 19, 2020, 05:27 PM IST

अहमदनगर : ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या सम-विषय वादग्रस्त वक्तव्यावर अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुंरबीकर यांनी पाठवलेल्या नोटीशीला उत्तर दिलं आहे. आज नोटीशीला उत्तर देण्याचा शेवटचा दिवस होता. कोणताही गाजावाजा न करता इंदुरीकरांनी आपल्या वकिलांमार्फत जिल्हा रूग्णालयात या नोटीशीला उत्तर दिलं आहे. नोटीशीत उत्तर म्हणून काय नमूद करण्यात आलं आहे, हे अजून कळू शकलेलं नाही.

सम तारखेला संभोग केला तर मुलगा जन्माला येतो, आणि विषम तारखेला संभोग केला तर मुलगी जन्माला येते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी एका कीर्तनातून केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली आहे. 

यानंतर इंदुरीकर यांनी हे आपलं मत नसून ग्रंथात हा उल्लेख असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी इंदुरीकर यांनी माफी देखील मागितली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी त्यांना प्रसूतिपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल का करू नये, अशी नोटीस इंदोरीकरांना बजावली होती. 

या कायद्यानुसार स्थापन झालेल्या सल्लागार समितीनेही नोटीस बजावली होती. या नोटीशीला आता इंदुरीकर यांनी उत्तर दिलं आहे.