मुंबई अभी बाकी है! बेळगाव विजयानंतर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान

भाजपच्या विजयानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे

Updated: Sep 6, 2021, 08:03 PM IST
मुंबई अभी बाकी है! बेळगाव विजयानंतर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान title=

पुणे : बेळगाव महापालिका निवडणुकीच्या (belgaum corporation election)  निकालावरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्यानंतर जल्लोष केला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत, लाज वाटत नाही का? अशी टीका संजय राऊत (sanjay raut) यांनी केली होती. या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश (alzyamer) झाला असावा, ते सकाळी काय बोलतात दुपारी काय आणि रात्री काय बोलतात त्यांना आठवत नाही, भाजपचे बहुतांश नगरसेवक मराठी आहेत त्यामुळं मराठी भाषिकांचा पराभव कसं म्हणता येईल, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

एखाद्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्या बाजुने असतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो, हे त्यांच्या स्वभावानुसारच आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या 'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है'बाबत चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले, 'बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे नक्की.