इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे पिकं जळून जात असल्यानं आत्महत्या केल्याचं म्हंटलं आहे

Updated: Apr 22, 2018, 05:24 PM IST

 

पुणे : इंदापूर येथून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यालाच नव्हे तर, सार्वजनीक जिवनात मोठ्या पदावर असलेल्या आणि आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याची झळ बसते आहे. शेतीसाठी पाणी न मिळाल्याने  इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक आणि शेतकरी वसंत सोपान पवार यांनी आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे. ते ४८ वर्षांचे होते.

विहीरीत उडी मारून आत्महत्या

वसंत सोपान पवार यांनी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि त्यामुळे पिकं जळून जात असल्यानं आत्महत्या केल्याचं म्हंटलं आहे. तसेच, आत्महत्येला जबाबदार असलेल्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी चिठ्ठीत केलीय.

परिसरात हळहळ

दरम्यान, सार्वजनीक जीवनात मोठ्या पदावर असणाऱ्या या आधुनिक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, सरकारने वेळीच उपाययोजना करून शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केला आहे.