रात्री गाडीतील पेट्रोल-साऊंड सिस्टम चोरीच्या घटनांत वाढ, सीसीटीव्हीत चोरी कैद

नाशिक शहरात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  

Updated: May 4, 2019, 11:00 PM IST
रात्री गाडीतील पेट्रोल-साऊंड सिस्टम चोरीच्या घटनांत वाढ, सीसीटीव्हीत चोरी कैद title=

नाशिक : शहरात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या वेळी पेट्रोल आणि गाडीतील साऊंड सिस्टम चोरीच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे यातील काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यात. नाशिकच्या सातपुर आणि सिडको भागात रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पेट्रोल चोर पार्किंगमध्ये जाऊन डल्ला मारत आहेत. 

अनेकदा नागरिकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना तोंडी माहिती दिली जाते. मात्र पुरावे नसल्याने घटनेकडे दुर्लक्ष केल जात. मात्र आता सीसीटीव्हीत चित्रित होऊनही पोलीस  लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तानाजी पवार, किशोर जुन्नरे आणि दिनेश पाटील यांनी तसा आरोप केलाय.

सातपुरच्या श्रमिकनगर परिसरातील नागरिकांनी तक्रारीबरोबर सिसिटीव्ही फुटेज दिल्यानंतर सातपुर पोलिसांनी दखल घेत तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. नाशिक शहरातील विविध भागांत अश्या घटना सातत्याने घडतात. पोलिसांनी या भुरट्या चोरांना पोलिसी खाक्या दाखविण्याची गरज आहे. तरच नाशिककर निर्धास्तपणे झोपू शकतील.