संगमनेरमध्ये एसटीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

एसटीच्या मासिक पासवर विद्यार्थ्यांना ६६.७ इतकी सवलत देण्यात येते.

Updated: Jun 25, 2019, 07:53 PM IST
संगमनेरमध्ये एसटीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय title=

संगमनेर : एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. संगमनेर तालुका एसटी डेपोतील हा प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणाबद्दल एका तरुणाने सर्व प्रकरणाबद्दल ट्वीट केले आहे. 

 

एसटीकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलत पाससाठी तब्बल दोन दिवसांपासून रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना पासवर सवलत दिली जाते. एसटीच्या मासिक पासवर विद्यार्थ्यांना ६६.७ इतकी सवलत देण्यात येते.

एसटीच्या पास खिडकीवरुन संथ पद्धतीने काम केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज चुकवून पासच्या रांगेत उभे रहावे लागत आहे. काही विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून पास मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले शिक्षण बुडवून पाससाठी वेळ वाया घालवावा लागत आहे.