पुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची पहाटेच मोठी कारवाई

Pune IT Raid : पुण्यात पहाटेच आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध निलकंठ ज्वेलरच्या दोन दुकानांवर आयकर विभागाने पहाटेच छापा टाकला आहे. आयकर विभागाकडून सध्या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये तपास सुरु आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 19, 2023, 09:44 AM IST
पुण्यात निलकंठ ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची पहाटेच मोठी कारवाई title=

Pune News : पुण्यात (Pune Raid) प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. पत्र्या मारुती चौक येथील सराफी दालनावर आयकर विभागाची (Income tax department) झाडाझडती सुरु आहे. हडपसर, मगरपट्टा, बाणेर या ठिकाणी देखील आयकर विभागाकडून धाडसत्र सुरु आहे. आयकर विभागाकडून पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू आहे. छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा उपलब्ध आहे. आयकर विभागाचे 40 अधिकारी छापासत्रासाठी दाखल झाले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सवर (Nilakant Jewelers) आयकर विभागाच्यावतीन पहाटेपासून छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात पहाटेच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्सच्या बाणेर आणि हडपसर या परिसरातील दुकानांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तसेच ज्वेलर्सच्या मालकाच्या घरीदेखील आयकर विभागाकडून छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 40 अधिकारी या कारवाईसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे समोर येत आहे.