रत्नागिरीत दीड किलो गांजासह दोघांना अटक

शहर आमली पदार्थांच्या विळख्यात येत असताना आता रत्नागिरी पोलिसांनी याबाबत कारवाई करायला सुरुवात केली. रत्नागिरी शहर पोलिसांनी तब्बल दीड किलो गांजासह दोघांना अटक केली.

Updated: Aug 17, 2017, 09:52 PM IST
रत्नागिरीत दीड किलो गांजासह दोघांना अटक   title=

रत्नागिरी : शहर आमली पदार्थांच्या विळख्यात येत असताना आता रत्नागिरी पोलिसांनी याबाबत कारवाई करायला सुरुवात केली. रत्नागिरी शहर पोलिसांनी तब्बल दीड किलो गांजासह दोघांना अटक केली.

 विशेष म्हणजे हा गांजा रहदारीच्या ठिकाणी पकडल्यामुळे गांजाची खुलेआम विक्री होत असल्याचं या घटनेवरून सिद्ध होत आहे. जिल्हा परिषदेच्या बाहेर मुख्य रस्त्यावर एक प्रवाशी व्हॅन उभी असल्याचे शहर पोलिसांच्या डिबी स्कॉडचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. गस्त घालत असताना ही गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसून आली. त्यामुळे शहर पोलिसांच्या डीबी स्कॉडच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. त्यावेळी त्या गाडीमध्ये त्यांना गांजा आढळून आला व हा गांजा कोल्हापूरहून रत्नागिरीत विक्रीसाठी आल्याचं देखील तपासात समोर आलं यासंदर्भात दोन तरुणांना पोलिसांनी अटक केलीय.

ओमणी चालक विशाल वसंत पाटील आणि गवळीवाडा येथे राहणारा जहीर काझी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल हा कोल्हापूरचा असून काझी हा रत्नागिरीतल्या गावळीवाडा येथील राहणारा आहे. या कारवाईमध्ये एकूण १ किलो २० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किमंत २५ हजाराच्या घरात आहे. तर ओमणी गाडीसह एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी दिली.