पत्नीच्या प्रेमप्रकरणाने घेतला पतीचा जीव, परिसरात खळबळ

पत्नी प्रियकराला सोडायला तयार नसल्याने वैतागून अखेर उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. 

Updated: Jun 6, 2022, 10:57 PM IST
पत्नीच्या प्रेमप्रकरणाने घेतला पतीचा जीव, परिसरात खळबळ title=

उस्मानाबाद - पत्नी प्रियकराला सोडायला तयार नसल्याने वैतागून अखेर उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावातील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केली आहे. सतीश तिवारी असे आत्महत्या केल्याची नाव आहे. मयताच्या भावाने ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनंतर पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in osmanabad the husband ended himself due to his wifes love affair)

 स्वाती सतीश तिवारी ही महिला उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांत परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिचा विवाह कोंड येथील सतीश कवरसिंग तिवारी यांच्यासोबत झाला होता. एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ते आहेत.

सतीश तिवारी हा तिच्या पत्नीसोबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्वार्टरमध्ये राहायचे. सतीश आणि स्वाती यांच्यात 3 वर्षापासून वाद सुरू झाला होता. हा वाद चारित्र्याच्या संशयावरून होत होता अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

सतीश 31 मे 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये गेला. त्यावेळेस क्वार्टरमध्ये ढोकी येथील विवेक देशमुख आणि स्वाती एकत्र संशयास्पद अवस्थेत रुमध्ये दिसले. 

त्यावरून सतीशने त्या दोघांना जाब विचारला. जाब विचारल्याने त्याला स्वाती आणि प्रियकर विवेक देशमुख या दोघांनी सतीशला बेदम  मारहाण केली.  सतीशने यानंतर घडलेल्या सर्व प्रकाराची पोलिसांना माहिती दिली आणि ढोकी पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली.

सतीशला आपल्या बायकोती वागणूक खटकायची.  त्यामुळे सतीश स्वातीला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.  मात्र ती त्याचे ऐकत नसल्याने सतीशने कोंड  शेतामध्ये आत्महत्या केली.  या प्रकरणी स्वाती आणि प्रियकर विवेक यांच्या विराधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

सतीशने आत्महत्या केल्याची वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. गावकरी आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. मात्र याप्रकरणी स्वाती आणि विवेक देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका सतिशच्या नातेवाईकांनी घेतली. 

पोलिसांनी काही वेळातच स्वातीला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हा दाखल केला.  त्यानंतरच नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन सतीश वर अंत्यसंस्कार केले.