'झी 24तास'चा इम्पॅक्ट : आता शाळांमध्ये पोषण आहार मिळणार

Now midday meal available in schools :15 मार्चपासून शाळांमध्ये पोषण आहार मिळणार आहे. 'झी 24तास'च्या बातमीनंतर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. 

Updated: Feb 23, 2022, 07:47 AM IST
'झी 24तास'चा इम्पॅक्ट : आता शाळांमध्ये पोषण आहार मिळणार title=
संग्रहित छाया

मुंबई : Now midday meal available in schools :15 मार्चपासून शाळांमध्ये पोषण आहार मिळणार आहे. 'झी 24तास'च्या बातमीनंतर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. कोरोनाकाळात शालेय पोषण आहार बंद होता. याबाबत 'झी 24तास'ने आवाज उठवला होता. (Zee 24 Taas's Impact : Now midday meal will be available in schools)

15मार्चपासून शालेय पोषण आहार पुन्हा सुरु होणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे पोषण आहाराचा पुरवठाही करण्यात आला होता. शाळा सुरु झाल्या तरीही शाळांमध्ये पोषण आहार मिळत नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परवड होत होती. 

'झी 24तास'ने याबाबतची बातमी दाखवताच प्रशासनाने याची दखल घेतली. आणि पोषण आहार सुरु करण्याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. या पार्श्वभूमीवर 15 मार्चपासून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे.