मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे. हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारी म्हणजे उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, ,सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, या जिल्ह्यांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहे.
नाशिकमध्ये गिरणारा, दुगाव, वाडगाव, शिव असे अनेक रस्ते गेल्या आठवड्यात पावसामुळे वाहून गेलेत. कसबे वाडीकडून वाडगावला जाणारा रस्ता सुद्धा गायब आहे. या रस्त्यावरून ये जा करणारे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
वर्धा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस झालाय..अश्यातच जिल्ह्यातले 84 पूल वाहून गेले आहेत. मात्र वर्ध्याच्या शिवाजी चौक ते पावडे चौक या रस्त्यावर पावसाळ्यात सिमेंट रस्त्यावर डांबरची डागडुगी करण्यात आली आहे.