राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि मुंबईत उन्हाच्या झळा अधिक लागणार आहे. तर दुसरीकडे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने आज विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहे. अरबी समुद्रावरुन आर्द्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्याने 25 एप्रिलपर्यंत उकाडा जाणवणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस किनारपट्टीच्या भागात तापमान वाढणार आहे. आद्रता वाढल्यामुळे असह्य उकाडयाचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असून उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल. तर मुंबईपासून दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टीवर वाढत्या तापमान घट होण्याची शक्यता आहे.
(हे पण वाचा - राज्यात Heatwave Alert जाहीर, लू आणि डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी)
कोकण किनारपट्टीसह मुंबईत पुन्हा तापमान वाढलं आहे. त्यामुळे उष्णतेबरोबर उकाडयाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. अरबी समुद्रावरून आद्र्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्यामुळे गुरुवार, 25 एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उकाडा जाणवेल. राज्याच्या अन्य भागात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडयात तुरळक प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
देशातच नाही तर परदेशातही बदलत्या हवामानामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हिमनद्या वितळत आहेत, त्यामुळे बर्फाळ भागात आढळणाऱ्या पेंग्विनचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय, जी माणसांबरोबरच प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण करते. उष्णतेची लाट हा अत्यंत उष्ण हवामानाचा काळ असतो. जे सहसा दोन किंवा अधिक दिवस टिकते. जेव्हा कोणत्याही भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त पोहोचते तेव्हा तेथे गरम वारे वाहू लागतात, ज्याला उष्णतेची लाट किंवा सामान्य भाषेत उष्णतेची लाट म्हणतात. पृथ्वीचे हवामान जसजसे उष्ण होत चालले आहे तसतसे दिवस आणि रात्रही उष्ण होत आहेत आणि उष्णतेच्या लाटांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे आजार तर वाढतातच पण जीवाला धोकाही वाढतो. सध्या देशाला हवामानाच्या दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे, उत्तर भारतात तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट आहे, तर डोंगराळ भागात बर्फवृष्टी आणि पावसामुळे जनजीवन कठीण झाले आहे आणि ही परिस्थिती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण देशातही आहे. परदेशी देशांचा देखील आहे.